Breaking News

आयपीएल 2026 आधी RCB ला मिळणार नवा मालक? मिळणार डोळे विस्फारणारी किंमत?

RCB
Photo Courtesy: X

RCB For Sale Before IPL 2026: तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ संपवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले होते. मात्र, हे सर्वोच्च यश मिळवल्यानंतरही आता संघाची विक्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलचे जनक ललित मोदी (Lalit Modi) यांनी याबाबत सूतोवाच केले आहे.

RCB For Sale Before IPL 2026

प्रसिद्धी आणि ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत सर्वात मोठी फ्रॅंचाईजी असलेल्या आरसीबीने आयपीएल 2025 आपल्या नावे केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेंगळुरू येथे संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांची चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. याच कारणाने सध्या आरसीबीची मालक असलेली लंडनस्थित डिआजिओ बेवरेजेस ही कंपनी आरसीबी विकण्याच्या तयारीत आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या ललित मोदी यांनी याबाबत ट्विट केले. त्यांनी लिहिले,

‘अखेर आरसीबी विकली जाईल. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या मात्र त्या पूर्ण झाल्यानंतर नव्हत्या. यावेळी मात्र डिआजिओ आरसीबीला आपल्या बॅलन्स शीटवरून काढण्यास सज्ज आहे. एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा अतिश्रीमंत नवीन मालक बनू शकतो. आरसीबी एक नवा उच्चांक निर्माण करेल.’

यापूर्वी देखील आरसीबी विकल्या जाण्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र, ललित मोदी यांच्या ट्विटने या बातमीत बऱ्यापैकी सत्यता असल्याचे बोलले जात आहे. आखाती देशातील अति श्रीमंत शेख किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उलाढाल असलेल्या कंपन्या संघ खरेदीसाठी उत्साह दाखवू शकतात. आरसीबी विकली गेल्यास हा सौदा 15,000 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. भारतातून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे आरसीबी खरेदीसाठी उत्सुक असल्याचे समजते. विराट कोहली (Virat Kohli) याच्यामुळे संघाची ब्रँड व्हॅल्यू वाढू शकते.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: PKL 12 मध्येही ‘नो हँडशेक’! हरियाणा-दिल्ली सामन्यात नक्की काय घडलं?

Exit mobile version