Breaking News

Mithun Manhas च बनला BCCI अध्यक्ष! बिनविरोध झाली निवड, 45 वय आणि…

mithun manhas
Photo Courtesy: X

Mithun Manhas Elected As New BCCI President: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळाला आहे. दिल्लीचा माजी रणजीपटू मिथुन मन्हास याची नवा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. बीसीसीआय अध्यक्ष होणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. तर, उपाध्यक्ष म्हणून अंतरिम अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.

Mithun Manhas Elected As New BCCI President

बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकी नवी कार्यकारणी घोषित केली गेली. सध्या 45 वर्षांच्या असलेल्या मन्हास यांनी दिल्लीसाठी प्रदीर्घ काळ देशांतर्गत क्रिकेट खेळले. याव्यतिरिक्त त्याला आयपीएलचा देखील अनुभव आहे. प्रशासनात त्याने यापूर्वी जम्मू व काश्मीर क्रिकेट संघटनेचा संचालक म्हणून काम पाहिलेले.

नव्या कार्यकारणीत मन्हास व शुक्ला यांच्या व्यतिरिक्त सचिव म्हणून देवजित सायकिया हे आपले पद राखण्यात यशस्वी ठरले. प्रभतेज सिंग भाटिया हे सहसचिव असतील. तर, आशिष शेलार यांच्या जागेवर खजिनदार म्हणून रघुराम भट यांना जबाबदारी दिली. एपेक्स कौन्सिलमध्ये जयदेव शहा यांच्यासह अरुण सिंग धूमल व एम. खैरुल हे काम पाहतील.

(Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन

Exit mobile version