Breaking News

टेनिस क्रिकेटने करून दाखवलं! ISPL 3 च्या MVP ला मिळणार अडीच कोटींची ‘ती’ कार

ispl3
Photo Courtesy: X

ISPL 3 News: टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयएसपीएल स्पर्धेचा तिसरा हंगाम पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळला जाईल. ही स्पर्धा पहिल्या दोन हंगामापेक्षा अधिक भव्यदिव्य असेल. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला तब्बल अडीच कोटींची कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या हस्ते या कारचे अनावरण करण्यात आले.

ISPL 3 MVP Will Get Porsche 911

पहिल्या दोन यशस्वी हंगामानंतर लवकरच आयएसपीएल स्पर्धेचा तिसरा हंगाम खेळला जाईल. तत्पूर्वी, एका कार्यक्रमात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला पोर्शे 911 ही कार देण्यात येणार असल्याची‌ घोषणा आयोजकांतर्फे केली गेली. सचिन तेंडुलकर व अभिनेता अजय देवगन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे अशा किमतीची कार आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा फ्रॅंचायजी क्रिकेटमध्ये देखील कधीही देण्यात आली नाही.

आयएसपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम टायगर्स ऑफ कोलकाता संघाने जिंकला होता. तर, दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद माझी मुंबई संघाने पटकावलेले. नव्या हंगामात आणखी दोन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. पहिल्या हंगामात करण अंबाला व दुसऱ्या हंगामात सागर अली यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावलेला. तिसऱ्या हंगामात या दोघांव्यतिरिक्त भावेश पवार, केतन म्हात्रे,‌ बबलू पाटील व अन्य काही खेळाडूंवर सर्वांची नजर असेल.

(Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Mithun Manhas च बनला BCCI अध्यक्ष! बिनविरोध झाली निवड

Exit mobile version