INDvsPAK, T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान संघातील सामना म्हटलं की, संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाते. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहतो. अशात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये आयोजित टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये रविवारी (दि. 9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर अली याने भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याविषयी मोठे विधान केले आहे. या विधानाची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे.
काय म्हणाला अझहर अली?
भारतीय संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. विराटचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात पसरला आहे. एवढंच काय, तर भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही विराटच्या चाहत्यांची कमी नाहीये. विराटची हीच लोकप्रियता पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर अली (Azhar Ali) याने माध्यमांशी बोलताना मोठे भाष्य केले.
तो म्हणाला की, “ज्या दिवशी विराट कोहली लाहोर, कराची, रावळपिंडी किंवा मुल्तानमध्ये खेळायला येईल, तेव्हा तुम्हाला समजेल की, पाकिस्तानमध्येही त्याचा चाहतावर्ग किती जास्त आहे.”
पुढे बोलताना अझहर म्हणाला की, “तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण संपूर्ण स्टेडिअम हिरव्या जर्सीने नक्कीच भरलेले असेल, पण जर्सीच्या मागे बाबर आझम किंवा शाहीन आफ्रिदीचे नाव नसेल. त्यावर विराट कोहलीचे नाव आणि जर्सीचा नंबर 18 असेल.” अझहर अलीच्या या विधानावरून समजते की, पाकिस्तानमध्ये विराटचे चाहते बाबर आणि आफ्रिदीपेक्षाही कैक पटींनी जास्त आहेत.
मात्र, विराट पाकिस्तानात जाऊन कधी खेळेल की, नाही, हे आताच सांगता येणार नाही. खरं तर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. अशात जर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला, तर हा ऐतिहासिक क्षण असेल. मात्र, भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाईल की नाही, अद्याप हे स्पष्ट नाही. (pakistan former captain azhar ali on virat kohli ind vs pak T20 World Cup 2024)
हे वाचलंत का?
“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…
“मला गरज असते तेव्हा तो कधीच…” धोनीबद्दल ‘हे’ काय बोलला Rishabh Pant?
Thanks for the auspicious writeup. It in reality was once a amusement account it. Look complicated to more added agreeable from you! However, how could we keep in touch?
Thank you for some other fantastic post. Where else could anybody get that type of info in such an ideal approach of writing? I’ve a presentation next week, and I am at the look for such information.