Breaking News

नव्या आव्हानांआधी Hockey India ने जाहीर केला 33 जणांचा संघ

hockey india
Photo Courtesy: X

Hockey India Announced For Training Camp: हॉकी इंडियाने 29 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2055 दरम्यान बेंगळुरू येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) सेंटरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी संघाची घोषणा केली आहे. या शिबिरासाठी 33 खेळाडूंची निवड केली गेली.

Hockey India Announced For Training Camp

वरिष्ठ भारतीय संघाचे हे शिबिर दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांपूर्वी आयोजित केले जात आहे. भारत नोव्हेंबरमध्ये 31 व्या सुलतान अझलन शाह कप स्पर्धेत सहभागी होईल. मलेशियातील इपोह येथे ही प्रतिष्ठित स्पर्धा खेळली जाईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे.

राजगीर येथे झालेल्या वरिष्ठ हॉकी आशिया कप 2025 मध्ये अपराजित राहिल्यानंतर भारतीय खेळाडू या शिबिरात उतरले आहेत. आशिया कप जिंकून भारतीय संघाने 2026 हॉकी पुरुष विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली होती.

शिबिरापूर्वी बोलताना, भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, “आशिया कप जिंकणे आणि विश्वचषक पात्रता मिळवणे हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. ही फक्त सुरुवात आहे. खेळाडू विजयाच्या भूकेसह शिबिरात परतले आहेत‌. आता आमचे लक्ष पूर्णपणे रणनीतिक तयारीकडे वळले आहे.”

प्रशिक्षण शिबिरासाठी निवडलेला संघ:
गोलकीपर- कृष्णन बी पाठक, सूरज करकेरा, पवन, मोहित होन्नेहल्ली शशिकुमार
बचावपटू- संजय, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, निलम संजीप सेस, जर्मनप्रीत सिंग, पूवन्ना चंदुरा बॉबी, यशदीप सिवाच, अमनदीप लाक्रा, वरुण कुमार
मध्यरक्षक- राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, मोइरंगथेम रबिचंद्र सिंग, विष्णूकांत सिंग, नीलकांत शर्मा, मोहम्मद राहिल मौसीन, मनिंदर सिंग
आक्रमक- अभिषेक, सुखजीत सिंग, सेल्वम कार्ती, शिलानंद लाक्रा, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अंगद बीर सिंग, आदित्य अर्जुन लाळगे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आयपीएल 2026 आधी RCB ला मिळणार नवा मालक? मिळणार डोळे विस्फारणारी किंमत?

Exit mobile version