Breaking News

Carlos Alcaraz ने विजेतेपदासह संपवला हंगाम! जपान ओपन 2025 केली नावे

Carlos Alcaraz Won Japan Open 2025: एटीपी टेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझ याने मंगळवारी (30 सप्टेंबर) जपान ओपनच्या अंतिम सामन्यात पाचव्या मानांकि टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याचा 6-4, 6-4 असा पराभव केला. ही स्पर्धा जिंकत त्याने या वर्षीचे आठवे एकेरी विजेतेपद पटकावले. तसेच, लेवर कपमधील आपल्या पराभवाचा बदला देखील घेतला. हे त्याच्या कारकीर्दीतील 24 वे एकेरी विजेतेपद ठरले.

Carlos Alcaraz Won Japan Open 2025

टोकियो येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रित्झ हा संघर्ष देखील करू शकला नाही. मागील आठवड्यात लेवर कपमध्ये त्याने अल्कारेझला कसलीही संधी न देता विजय संपादन केलेला. मात्र, या सामन्यात अल्कारेझ सरस ठरला. यासह त्याने हंगाम 67 विजय व 7 पराभवांसह संपला. विजयानंतर बोलताना तो म्हणाला,
“निःसंशयपणे हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम होता. यावरून हे क्षण अनुभवण्यासाठी आणि माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी किती कठोर परिश्रम केले आहेत हे दिसून येते.”

या विजयानंतर, अल्कारेझने सोशल मीडियावर घोषणा केली की तो रोलेक्स शांघाय मास्टर्समधून माघार घेत आहे. मात्र, पुढील वर्षी चीनमध्ये नक्की खेळू असे आश्वासन देखील दिले.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आयपीएल 2026 आधी RCB ला मिळणार नवा मालक? मिळणार डोळे विस्फारणारी किंमत?

Exit mobile version