Breaking News

मुंबईकरांनी नादच केला! ऐतिहासिक Victory Parade मध्ये इतक्या लाख लोकांनी घेतला सहभाग, तुटले सारेच रेकॉर्ड

VICTORY PARADE
Photo Courtesy: X

Team India Victory Parade: टी 20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी (4 जुलै ) मायदेशी आगमन झाले. पहाटे दिल्ली येते पोहचल्यानंतर सायंकाळी संघ मुंबई येथे दाखल झाला. यानंतर संघाचा सत्कार समारंभ वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे पार पडला.

जगातील सर्वात मोठे क्रिकेटप्रेमी म्हणल्या जाणाऱ्या मुंबईकरांनी त्याच प्रकारे संघाचे स्वागत केले. मरीन ड्राइव्ह येथे तब्बल 2 लाख 10 हजार भारतीय क्रिकेट चाहते या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले. तसेच क्षमतेपेक्षा जास्त चाहत्यानी वानखेडे स्टेडियम येथे हजेरी लावली. वानखेडे स्टेडियमवर जवळपास 40 हजार चाहते जमा झाले होते.

भारतीय संघ मुंबई येथे 4 वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, भारतीय संघाला मुंबईत पोहोचण्यासाठी जवळपास दोन तास उशीर झाला. भारतीय संघाची मरीन ड्राईव्ह येथून साडेसात वाजता विजयी मिरवणूक निघाली. जवळपास सव्वा तास ही मिरवणूक नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी चालली.

असे असले तरी दुपारी तीन वाजल्यापासून चाहत्यांनी मरीन ड्राईव्ह येथे गर्दी करण्यास सुरुवात केलेली. यादरम्यान पाऊस आला तरी चाहत्यांनी आपली जागा सोडली नाही. मिरवणुकी दरम्यान काही चाहते झाडांवर तर काही ट्रॅफिक सिग्नलवर देखील उभे राहिलेले दिसले.

भारतीय संघाच्या 2007 मध्ये निघालेल्या अशाच प्रकारच्या मिरवणुकीत जवळपास 2 लाख 50 हजार लोक सामील झाल्याचे सांगण्यात येते.

(More Than 2 Lakh Fans Gathered In Team India Victory Parade)

Exit mobile version