Breaking News

Womens Cricket World Cup 2025 मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी! दिप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी

womens cricket world cup 2025
Photo Courtesy: X

Womens Cricket World Cup 2025: आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान भारत विरुद्ध श्रीलंका (INDW vs SLW) असा खेळला गेला. भारतीय संघाने खेळाच्या तीनही विभागात शानदार कामगिरी करत विजय संपादन केला. अष्टपैलू कामगिरी करणारी दिप्ती शर्मा (Deepti Sharma) सामन्याची मानकरी ठरली.

India Beat Srilanka In Womens Cricket World Cup 2025 Opener

गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना केवळ आठ धावा काढून बाद झाली. भारतीय संघाने पहिल्या 13 षटकात अर्धशतकही पूर्ण केले नव्हते. त्यानंतर पावसामुळे काही काळ खेळ थांबला. याच कारणाने सामना प्रत्येकी 47 षटकांचा केला गेला.

प्रतिका रावल (37) व हरलीन देओल (48) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. मात्र, इनोका रणवीरा हिने एका षटकात हरलीन, जेमिमा व हरमनप्रीत यांना बाद करत भारताला दबाव टाकले. मात्र, अमनजोत कौर व दिप्ती शर्मा यांनी सातव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 103 धावांची भागीदारी करत संघाला 200 पार नेले. अमनजोतने 56 चेंडूत 57 व दिप्तीने 53 चेंडूवर नाबाद 53 धावा केल्या. अष्टपैलू स्नेह राणाने 15 चेंडूंमध्ये नाबाद 28 धावा करत भारताला 269 पर्यंत पोहचवले.

डकवर्थ लुईस नियमानुसार, विजयासाठी 271 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या श्रीलंकेला 30 धावांची सलामी मिळाली‌. कर्णधार चमारी अट्टापटू व हर्षिता समरविक्रम यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, दिप्तीने 43 धावांवर चमारीचा त्रिफळा उडवून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर श्रीलंकेच्या इतर फलंदाज नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करू शकले नाही. दिप्ती, श्री चरणी व स्नेह राणा या फिरकी तिकडीने कमाल करत श्रीलंकेचा डाव संपवला. तीन बळी व अर्धशतक करणारी दिप्ती सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आयपीएल 2026 आधी RCB ला मिळणार नवा मालक? मिळणार डोळे विस्फारणारी किंमत?

Exit mobile version