Breaking News

ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

eng vs ind
Photo Courtesy: X

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी रविवारी (6 जून) समाप्त झाली. एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तसेच, बर्मिंगहॅम येथील या मैदानावर भारतीय संघाने 58 वर्षात प्रथमच कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी केली. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) भारताच्या विजयाचे शिल्पकार राहिले. 

ENG vs IND Team India Won Edgbaston Test First Time

चौथ्या दिवसाच्या खेळानंतर भारतीय संघाला विजयासाठी केवळ सात बळींची आवश्यकता होती. पावसामुळे जवळपास दीड तास उशीरा सुरू झालेल्या पाचव्या दिवशी भारताने दमदार सुरुवात केली. चौथ्या दिवशीच्या खेळात केवळ 11 धावांची भर घालत, नाबाद फलंदाज हॅरी ब्रूक व ओली पोप माघारी परतले. दोघांना आकाश दीपने बाद केले.

त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स व जेमी स्मिथ यांची जोडी जमली. त्यांनी पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. लंचआधीच्या अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर याने स्टोक्सला पायचित करत भारताला मोठे यश मिळवून दिले.

त्यानंतर दिवसातील दुसरा सत्रात भारताचे विजयाची औपचारिकता बाकी होती. वोक्स व टंग हे दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. एका बाजूने पहिल्या डावातील शतकवीर जेमी स्मिथ उभा होता. त्याने ड्रिंक्सपर्यंत किल्ला लढवला. आकाश दीप याला सलग दोन षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तो 88 धावा करून बाद झाला. ब्रायडन कार्स याने 38 धावा करत संघासाठी अखेरचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर हे भारताने 336 धावांनी इंग्लंडमधील आपला सर्वात मोठा विजय मिळवला. शुबमन गिल सामन्याचा मानकरी ठरला.

भारतीय संघ 1967 पासून या मैदानावर खेळत आहे. यापूर्वी झालेल्या आठ कसोटी सामन्यात भारताला सात पराभव पत्करावे लागले होते. तर, एक सामना अनिर्णित राहिलेला. मात्र, या विजयासह भारत एजबॅस्टन येथे कसोटी विजय मिळवणारा आशिया खंडातील पहिला देश बनला आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Edgbaston Test Day 3: ब्रूक-स्मिथच्या त्रिशतकी भागीदारीने सामना रंगला, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 4: टीम इंडिया इतिहास रचण्याच्या काठावर, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version