Breaking News

डोंगराएवढ दुःख घेऊन खेळला Akash Deep, ‘त्या’ व्यक्तीला आठवून टाकत होता प्रत्येक चेंडू, 10 विकेट आणि…

akash deep
Photo Courtesy: X

Akash Deep Dedicated 10 Fer To His Sister: भारतीय क्रिकेट संघाने एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज आकाश दीप याने 10 बळी मिळवत सिंहाचा वाटा उचलला. त्याने आपली ही कामगिरी एका खास व्यक्तीला समर्पित केली.

Akash Deep Dedicated 10 Fer To His Cancer Patient Sister

भारतीय संघाने पहिल्या डावात 587 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 407 धावांवर रोखले. प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या व पहिला सामना खेळणाऱ्या आकाश दीप याने या डावात चार बळी मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने यापेक्षा शानदार कामगिरी करत सहा बळी मिळवत, आपल्या कारकिर्दीतील पहिले पंचक मिळवले. तसेच, सामन्यात 10 बळी घेण्याची कामगिरी देखील नोंद केली.

सामन्यानंतर चेतेश्वर पुजारा याच्याशी बोलताना, आकाश दीप म्हणाला, “माझी ही कामगिरी मी माझ्या बहिणीला समर्पित करतो. तिला दोन महिन्यांपूर्वी कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. सध्या ती ठीक आहे. मात्र, मी प्रत्येक चेंडू तिलाच आठवून टाकत होतो.”

आकाश दीप याने मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध मायदेशात आपले कसोटी पदार्पण केले होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

Exit mobile version