Breaking News

Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”

Vinesh Phogat On PM Modi Call: भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही तिला अपात्र (Vinesh Phogat Olympic Disqualification) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर करत, थेट सक्रिय राजकारणात उडी घेतली. आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिने एक खळबळजनक खुलासा केला आहे.

vinesh phogat
Photo Courtesy: X

Vinesh Phogat On PM MOodi

विनेश हिने पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये महिला गटातील 50 किलोग्राम फ्रीस्टाइल वजनी गटात अंतिम फेरी धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळीच केवळ 50 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची मोठी चर्चा झाली. यामध्ये राजकीय हात असल्याचे देखील शक्यता वर्तवली जात होती. आता स्वतः विनेश हिने याबाबत खुलासा केला.

एका मुलाखतीत बोलताना विनेश हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा कॉल आला होता का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “हो, मला असा कॉल आला होता. थेट हा कॉल मला आला नसला तरी, भारतीय संघाचे प्रतिनिधी मला म्हणाले की, पंतप्रधान व्हिडिओ कॉलवर तुझ्याशी बोलणार आहेत. मी त्याला होकार दिला. मात्र, त्यावेळी त्यांनी अट ठेवली की, यादरम्यान तुझ्या टीममधील कोणीही येथे उपस्थित नसेल. आमच्या प्रतिनिधींपैकी एक व्यक्ती या कॉलचे रेकॉर्डिंग करेल आणि दुसरा कॉल लावून देईल. तसेच हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येईल. त्यांच्या या अट ऐकून मी कॉल घेण्यास नकार दिला. मी माझ्या बाजूने देखील कॉल रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी असहमती दर्शवली.”

हे देखील वाचा: Dhoni Fan Gaurav: धोनीला भेटायला 1200 किमी आला सायकलने; मात्र MSD ने केले दुर्लक्ष, वाचा धक्कादायक प्रकरण

ती पुढे म्हणाली, “त्यांना खरंच माझ्याबद्दल सहानुभूती असती तर, बिना रेकॉर्डिंग ते माझ्याशी बोलू शकत होते. कदाचित त्यांना असे वाटत होते की, मी त्यांना दोन वर्षाचा हिशोब मागेल. रेकॉर्डिंग केली असती तरी, त्यांनी ती काटछाट करून प्रसारित केली असती. मी मात्र जे काही बोलणे झाले असते ते संपूर्णपणे प्रसारित करणार होते. मला माझ्या मेहनत आणि भावनांची सोशल मीडियावर खिल्ली उडवून घ्यायची नव्हती.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जुलना विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवत आहे.

(Vinesh Phogat On PM Modi Call After Paris Olympics 2024)

Exit mobile version