Breaking News

India Tour Of Australia 2025: ‘कॅप्टन हिटमॅन’ पर्व संपले! हा फलंदाज बनला भारताचा नवा वनडे कर्णधार

india tour of australia 2025
Photo Courtesy: X

ODI Squad For India Tour Of Australia 2025: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. तीन‌ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी अनुभवी रोहित शर्मा (Virat Kohli) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी पुनरागमन केले. मात्र, कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्या जागी शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी देण्यात आली आहे. 

ODI Squad For India Tour Of Australia 2025

वनडे व टी20 मालिकांच्या या दौऱ्यासाठी वनडे संघ निवडताना निवड समितीने अनेक धक्के दिले. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर प्रथमच वनडे मालिका खेळत असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पुनरागमन केले. मात्र, त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत कसोटी कर्णधार शुबमन गिल याला नियमित कर्णधार बनवण्यात आले. तर, रोहितसह अनुभवी विराट कोहली हा देखील संघात निवडला गेला.

जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिल्याचे निवड समितीने स्पष्ट केले. या व्यतिरिक्त श्रेयस अय्यर वनडे संघातील आपली जागा कायम करण्यात यशस्वी ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड न झालेला मोहम्मद सिराज याने संघात पुनरागमन केले. यशस्वी जयस्वाल व ध्रुव जुरेल हे प्रथमच भारताच्या वनडे संघाचा भाग बनले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, नितिशकुमार रेड्डी, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ध्रुव जुरेल, केएल राहुल,‌ वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आयपीएल 2026 आधी RCB ला मिळणार नवा मालक? मिळणार डोळे विस्फारणारी किंमत?

 

Exit mobile version