
INDvSA South Africa Beat India In Guwahati Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 140 धावांवर संपुष्टात आला. यासह भारताचा 408 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जेन्सन (Marco Jansen) याला सामनावीर तर फिरकीपटू सायमन हार्मर (Simon Harmer) याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
INDvSA South Africa Beat India In Guwahati Test
कोलकाता येथील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने आघाडी मिळवली होती. गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. सातव्या क्रमांकावरील सेनुरन मुत्थूस्वामी याने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. तर, नवव्या क्रमांकावर आलेल्या मार्को जेन्सनने 93 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या 489 धावांनंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला. मात्र, जेन्सन याने गोलंदाजीतही कहर करताना 6 बळी मिळवले. त्यामुळे भारताचा डाव 201 धावांवर संपुष्टात आला. फॉलोऑन देण्याची संधी असताना देखील दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रिस्टन स्टब्सच्या 94 व टोनी डी झोर्झी याच्या 49 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेने 260 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी 549 धावांचे आव्हान उभे राहिले.
चौथ्या दिवशीच्या अखेरीस भारताने यशस्वी जयस्वाल व केएल राहुल यांना गमावत 27 धावा काढल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारतीय संघ संघर्ष करेल असे वाटत असताना सायमन हार्मर याने 6 बळी मिळवले. रविंद्र जडेजा याने भारतासाठी एकमेव अर्धशतक झळकावले. केशव महाराजने दोन बळी मिळवत भारताचा डाव 140 धावांवर संपवला.
भारतीय संघाचा हा धावांच्या फरकाने झालेला सर्वात मोठा पराभव आहे. तर, दक्षिण आफ्रिकेने 1999-2000 नंतर प्रथमच भारतात मालिका जिंकण्याची कामगिरी केली. तर, भारतीय संघाचा मायदेशातील मागील तीन मालिकांपैकी दोन मालिकेतील क्लीन स्वीप ठरला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: राडाच! धोनीचा उत्तराधिकारी Urvil Patel चा 31 चेंडूत शतकी धमाका, SMAT 2025 ची वादळी सुरुवात
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।