Breaking News

बडा खिलाडी Mitchell Starc! आजवर खेळलेल्या प्रत्येक फायनलमध्ये संघ बनलाय चॅम्पियन, पाहा जबरदस्त आकडेवारी

mitchell starc
Photo Courtesy: X

Mitchell Starc Won Every Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचे महत्त्वाचे योगदान राहिले. तब्बल नऊ वर्षानंतर आयपीएल खेळत असलेल्या स्टार्कने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार नावे केला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नऊ वेळा मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळलेला स्टार्क प्रत्येक वेळी विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या स्टार्क याची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली होती. मात्र, स्पर्धा पुढे सरकल्यानंतर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली. केकेआरने खेळलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात, क्वालिफायर एक व अंतिम सामन्यात तो सामनावीर ठरला. अंतिम सामन्यातही त्याने पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा याला स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू टाकत बाद केले. तसेच राहुल त्रिपाठी याचा देखील अडसर त्याने दूर केला. इतर गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला केवळ 113 धावांवर रोखले.

स्टार्कने मोठ्या स्पर्धांचे आतापर्यंत नऊ अंतिम सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये त्याचा संघ विजेता ठरला. तो संघाचा भाग असलेल्या सिडनी सिक्सर्स संघाने 2012 बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2012 मध्येच या संघासोबत चॅम्पियन्स लीग जिंकली. त्यानंतर 2015 विश्वचषकाचा अंतिम सामना त्याने खेळलेला व ऑस्ट्रेलिया संघ विजेता ठरलेला. याच वर्षी त्याने न्यू साउथ वेल्ससाठी शेफिल्ड शील्ड स्पर्धा जिंकलेली.

स्टार्कने त्यानंतर 2020 टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाला विजेता बनवले. तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात डोमेस्टिक वनडे कप जिंकला. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप व वनडे विश्वचषक उंचावला. या दोन्ही अंतिम सामन्यात स्टार्क खेळला होता. त्यानंतर आता आयपीएल फायनलमध्ये देखील त्याचा संघ विजेता ठरला आहे. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी देखील त्याचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश असून, ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा दावेदार आहे.

(Mitchell Starc Won All 9 Final Which He Played On Highest Level)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version