
India Won Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेश येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने (Indian Womens Kabaddi Team) अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपई संघाला 35-28 असे पराभूत केले. तब्बल बारा वर्षानंतर झालेल्या या विश्वचषकात विजय मिळवून भारताने विजय मिळवून, विश्वचषक राखला.
India Won Womens Kabaddi World Cup 2025
ढाका येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीत सर्व चार विजय मिळवले होते. त्यानंतर उपांत्य सामन्यात इराणला पराभूत केले. अंतिम सामन्यात चायनीज तैपईने भारतीय संघाला चांगलीच झुंज दिली. मात्र, भारतीय खेळाडूंच्या अनुभवापुढे त्यांना हार पत्करावी लागली. यजमान बांगलादेश संघाने इराणला नमवत ब्रॉंझ पदक जिंकले.
भारताची अष्टपैलू संजू देवी ही स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. चायनीज तैपईची आय मीन लीन ही सर्वोत्तम रेडर व बांगलादेशची श्रीती अख्तेर सर्वोत्तम बचावपटू ठरली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: जय हो! भारतीय मुली Womens Kabaddi World Cup च्या फायनलमध्ये