Breaking News

INDvPAK| न्यूयॉर्कमध्ये दिसली पाकिस्तानच्या पेस बॅटरीची पॉवर, टीम इंडिया 119 वर ऑल-आऊट

indvpak
Photo Courtesy: X/PCB

T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर, रिषभ पंत (Rishabh Pant) याने संघाचा डाव सावरला. तळातील फलंदाजांनी हातभार लावत भारताचा डाव 119 पर्यंत नेला.

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना दुसऱ्याच षटकात विराट कोहलीच्या रूपाने मोठे यश मिळाले. तर, तिसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेल याने 18 धावांचे योगदान देत पण त्याला साथ दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादव हे केवळ सात धावांचे योगदान देऊ शकला. एका बाजूने रिषभ पंत आक्रमक खेळ दाखवत होता.

भारतीय संघ 3 बाद 89 अशा स्थितीत असताना सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे (3) व रविंद्र जडेजा (0) हे देखील फारसं योगदान देऊ शकले नाहीत. त्यानंतर हार्दिक पांड्या‌ फक्त 7 धावा करू शकला. हारिस रौफने त्याला व बुमराहला लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर अर्शदीपने 9 व सिराजने 7 धावा करत भारताला 119 पर्यंत नेले.

पाकिस्तान संघासाठी रौफ व नसीम शहा यांनी प्रत्येक तीन बळी मिळवले. तर, आमीरने दोन व शाहीनला एक बळी मिळाला.

(T20 World Cup 2024 INDvPAK Pakistan Restrict India On 119)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version