Breaking News

Gautam Gambhir: अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची नियुक्ती, जय शहांनी केली घोषणा

Gautam Gambhir Appointed As Head Coach : टी20 विश्वचषक 2024 सह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे कुणाच्या हाती जातील, याची क्रिकेटचाहत्यांना प्रतिक्षा होती. आयपीएल 2024 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक व मार्गदर्शन गौतम गंभीर याला भारताच्या प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर आज (09 जुलै) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Exit mobile version