Breaking News

Virat Kohli च्या जीवाला धोका? RCB चे सराव सत्र रद्द

VIRAT KOHLI
Photo Courtesy: X

Virat Kohli Security Threats| बुधवारी (22 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RRvRCB) यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना होणार आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधी आरसीबीने आपले सराव सत्र रद्द केले‌. अहमदाबाद विमानतळावरून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये म्हणून आरसीबीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही संघांची पत्रकार परिषदेतील रद्द केली गेली.

सोमवारी (20 मे) अहमदाबाद विमानतळावर आइसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या चार आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी अहमदाबाद येथे आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्सचे सामने खेळले जात आहेत. बुधवारी होणार असलेल्या राजस्थान विरुद्ध आरसीबी या सामन्याआधी आरसीबी संघाला गुजरात कॉलेज ग्राउंड येथे सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, विराट कोहली व इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव आरसीबी संघ व्यवस्थापनाने सराव न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल संघाने आपले सराव सत्र पूर्ण केले. दुसरीकडे आरसीबी संघ व्यवस्थापनाकडून सराव सत्र रद्द करण्याचे अधिकृत कारण सांगितले गेले नाही.

दोन्ही संघांच्या सुरक्षेत यावेळी वाढ करण्यात आली असून, राजस्थान संघाच्या सरावावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभा करण्यात आला होता. तसेच, खेळाडूंच्या हॉटेलमध्ये पत्रकारांना तसेच बाहेर कोणत्याही व्यक्तीला येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(RCB Cancelled There Practice Session Due To Virat Kohlis Security Threats Ahead IPL 2024 Eliminator)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version