Breaking News

INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत

INDW vs SAW
Photo Courtesy: X/BCCI Womens

INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.‌

मालिकेतील पहिला सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय साजरा केला होता. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी करत त्यांचा डाव केवळ 84 धावांवर संपवला. भारतासाठी वेगवान गोलंदाज पुजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिने चार तर फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) हिने तीन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या या छोट्या धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 40 चेंडूवर नाबाद 54 तर शेफाली वर्मा हिने नाबाद 27 धावा केल्या. सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार पुजा वस्त्राकर हिला दिला गेला.

यापूर्वी, दोन्ही संघादरम्यान झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 3-0 असा मालिका विजय साजरा केला होता. तर, एकमेव कसोटीत देखील भारतीय संघाने विजय साजरा केलेला.

(INDW vs SAW India Won 3rd T20I Series Draw)

Exit mobile version