Breaking News

हेड कोच बनताच Gautam Gambhir ने सुरु केले काम, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुचवली ‘ही’ नावे, वाचा सविस्तर

GAUTAM GAMBHIR
Photo Courtesy: X

Gautam Gambhir As India Head Coach: मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेईल. मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता गंभीर याने बीसीसीआयला सहाय्यक प्रशिक्षक व गोलंदाजी प्रशिक्षक या पदांसाठी नावे सुचवली आहेत.

राहुल द्रविड यांच्यानंतर गंभीर मोठ्या कालावधीसाठी हे पद भूषवेल. हे पद स्वीकारताना गंभीरने संघाचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे ही अट ठेवल्याचे सांगण्यात येतेय. त्यानुसार त्याने फलंदाजी प्रशिक्षक हे पद काढून टाकत सहाय्यक प्रशिक्षक पद आणले आहे. त्यासाठी मुंबईचा माजी कर्णधार आणि सध्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या अभिषेक नायर (Abhishek Nayar) याचे नाव सुचवले आहे. नायर याच्याकडे प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. तसेच, त्याची आणि गंभीरची प्रशिक्षणाची पद्धत एकसारखी आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या जागी भारताचा माजी अष्टपैलू आर. विनय कुमार (Vinay Kumar) याचे नाव गंभीरने बीसीसीआयसमोर ठेवले आहे. विनय याने गंभीरसोबत केकआरमध्ये बराच काळ ड्रेसिंग रूम शेअर केली होती. या कारणांमुळे गंभीरने त्याचे नाव पुढे केले आहे. आता या मागणीवर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

या सर्वांमध्ये सध्या भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असलेल्या टी. दिलीप (T. Dilip) यांची जागा मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. ते भारतीय खेळाडूंचे आवडते असल्याने सध्या तरी नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणण्याची बीसीसीआयची योजना नाही.

(Gautam Gambhir Suggest Abhishek Nayar And Vinay Kumar As Coaches)

Exit mobile version