Breaking News

विदर्भाच्या नावे Irani Trophy 2025! शेष भारताला एकहाती लोळवले

irani trophy 2025
Photo Courtesy: X

Vidharbha Won Irani Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या इराणी ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (5 ऑक्टोबर) समाप्त झाला. रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाने विशेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणारा अथर्व तायडे (Atharva Tayde) सामन्याचा मानकरी ठरला. 

Vidharbha Won Irani Trophy 2025

नागपुर येथे झालेल्या या सामन्यात विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 342 धावा उभ्या केल्या होत्या. अनुभवी अथर्व तायडे याने 143 तर यश राठोड याने 91 धावांचे योगदान दिलेले. या धावांचे प्रत्युत्तर देताना शेष भारत संघाचा डाव अवघ्या 214 धावांमध्ये संपला. यश ठाकूर याने विदर्भासाठी चार बळी टिपले. विदर्भाकडे त्यामुळे 128 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी राहिली.

दुसरा डावा फलंदाजीला उतरलेल्या विदर्भाला 232 धावांपर्यंत पोहोचता आले. शेष भारत संघासाठी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने चार बळी मिळवले. विजयासाठी 360 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या शेष भारत संघाचा डाव अखेरच्या दिवशी 267 धावांवर समाप्त झाला. विदर्भासाठी फिरकीपटू हर्ष दुबे याने चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह रणजी ट्रॉफीपाठोपाठ विदर्भाने ही प्रतिष्ठेची स्पर्धा देखील जिंकली.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: India Tour Of Australia 2025: ‘कॅप्टन हिटमॅन’ पर्व संपले! हा फलंदाज बनला भारताचा नवा वनडे कर्णधार

Rohit Sharma च्या ‘कॅप्टन्स एरा’ची समाप्ती! दिमाखदार राहिली कारकीर्द, वाचा सविस्तर

 

Exit mobile version