Breaking News

“…आणि Zaheer Khan ची टीम इंडियात निवड झाली”, दादाने सांगितली झॅकच्या सिलेक्शनची गोष्ट

ZAHEER KHAN
Photo Courtesy: X

Saurav Ganguly On Zaheer Khan Selection: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) हा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय संघात अनेक उमद्या खेळाडूंनी पदार्पण केले. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी तो एक आहे. त्याच्याच नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या झहीर खान (Zaheer Khan) याच्या पदार्पणाचा किस्सा त्याने नुकताच सांगितला.

गांगुली याच्या नेतृत्वात भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, एमएस धोनी, गौतम गंभीर, झहीर खान व सुरेश रैना यांच्यासारख्या खेळाडूंनी पदार्पण केले होते. पुढे जाऊन या सर्व खेळाडूंना भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांचा दर्जा मिळाला. मात्र, झहीरच्या निवडीचे श्रेय त्याने संघातील दुसऱ्याच अनुभवी खेळाडूला दिले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

एका कार्यक्रमात बोलत असताना गांगुली म्हणाला, “झहीर भारताचा एक महान गोलंदाज आहे. मात्र, त्याच्या निवडीचे श्रेय हे जवागल श्रीनाथ याला जाते. त्याने त्याचा खेळ पाहिला होता. त्यानंतर त्याने आम्हाला झहीरचे नाव सुचवले.”

झहीर याने 2000 मध्ये केनिया येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी श्रीनाथ भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज होता. पुढे श्रीनाथ निवृत्त झाल्यानंतर झहीरने त्याची जागा घेतली. 2003 वनडे विश्वचषकात त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली. मात्र, अंतिम सामन्यात तो अपयशी ठरलेला. परंतु, 8 वर्षानंतर मायदेशात झालेल्या विश्वचषकात त्याने सर्वाधिक 21 बळी मिळवत, भारताला 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकून दिला.

झहीर याने आपल्या कारकिर्दीत 92 कसोटी सामन्यांमध्ये खेळताना 311 बळी मिळवले. तर, 200 वनडेमध्ये त्याच्या नावे 282 बळी आहेत. त्याने भारतासाठी 17 टी20 सामने खेळताना तितकेच बळी मिळवले. तर, आयपीएलमध्ये देखील त्याने 102 बळी टिपले आहेत. निवृत्तीनंतर त्याने काही काळ मुंबई इंडियन्ससाठी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली होती. सध्या तो लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर बनणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

(Saurav Ganguly On Zaheer Khan Selection In Team India)

Shikhar Dhawan Retirement: शिखरच्या करियरमधील 5 संस्मरणीय इनिंग्स! चाहत्यांच्याही राहतील नेहमीच आठवणीत

Exit mobile version