Breaking News

T20 World Cup 2024| टीम इंडिया विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये! युएसएने जिंकली मने, मुंबईकर चमकले

T20 World Cup 2024
Photo Courtesy: X/BBCI

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत बुधवारी (12 जून)  भारत आणि युएसए (IND vs USA) समोरासमोर आले. अ गटातील झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर 7 गडी राखून विजय खेचून आणला. या विजयासह भारताचे सुपर 8 (Super 8) मधील स्थान पक्के झाले.

नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर शायन जहांगीर याला बात केले. तर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर गौसला हार्दिकच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर कर्णधार जोन्स (11) व टेलर (24)  यांनी भागीदारी करत सामन्यात पुनरागमन केले. ते दोघे बाद झाल्यानंतर नितीश कुमार याने महत्त्वपूर्ण 27 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी देखील उपयुक्त योगदान देत संघाला 110 पर्यंत नेले. भारतासाठी अर्शदीप सिंग याने 4 तर हर्दिक पंड्या याने 2 बळी टिपले.

या धावांचा पाठलाग करताना भारताला देखील पहिल्या षटकात विराट कोहलीच्या रूपाने पहिला धक्का बसला. तो खातेही खोलू शकला नाही. तर तिसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा देखील वाद झाला‌. त्या दोघांनाही सौरभ नेत्रावळकर याने बाद केले. रिषभ पंत हा 18 धावा करून अली खानचा शिकार ठरला. भारतीय संघ संकटात आल्यानंतर दोन मुंबईकर सूर्यकुमार यादव (50) व शिवम दुबे (31) यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संयमी भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.‌ चार बळी घेणाऱ्या अर्शदीप सिंग याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.

(T20 World Cup 2024 India Beat USA By 7 Wickets Entered In Super 8)

3 comments

  1. This website is my intake, real wonderful design and perfect subject material.

  2. Hello there I am so grateful I found your weblog, I really found you by mistake, while I was browsing on Yahoo for something else, Anyways I am here now and would just like to say thanks a lot for a incredible post and a all round thrilling blog (I also love the theme/design), I don’t have time to read through it all at the moment but I have saved it and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read a lot more, Please do keep up the awesome work.

  3. What’s Happening i am new to this, I stumbled upon this I’ve found It positively useful and it has helped me out loads. I hope to contribute & help other users like its helped me. Great job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version