Breaking News

Virat Kohli ला काय झालंय? वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यात ठरला सुपर फ्लॉप, आकडे अगदीच निराशाजनक

Virat Kohli
Photo Courtesy: X

Virat Kohli Fail In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ साखळी फेरीतील आपले तीन सामने खेळला आहे. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवत, सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. मात्र, या तीनही सामन्यात भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा फ्लॉप ठरला आहे. भारताच्या या तीनही विजयात तो आपले योगदान देऊ शकला नाही (Virat Kohli Flop In T20 World Cup 2024).

भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या विराट कोहली याने मागील पाचही टी20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. त्यामुळे या विश्वचषकात त्याच्याकडून सर्वांना अपेक्षा होत्या. तसेच, अवघ्या 20 दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये त्यांनी 700 पेक्षा जास्त धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केलेली.

भारतीय संघाने या विश्वचषकातील आपले पहिले तीनही सामने न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे खेळले. अतिशय नव्या असलेल्या या स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांना तितकी अनुकूल नाही. परंतु, अशा परिस्थितीत विराटसारख्या फलंदाजाकडून धावांची अपेक्षा केली जात होती.

विराटने विश्वचषकातील आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात तो पाच चेंडू खेळून फक्त एक धाव करू शकलेला. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने तीन चेंडूंचा सामना करत चार धावा वसूल केल्या. तर, युएसएविरूद्ध सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) याने त्याला पहिल्याच चेंडूवर (Virat Kohli Golden Duck) बाद केले.

साखळी फेरीत भारताला विराटच्या योगदानाची गरज तितकीशी भासली नाही. मात्र, सुपर 8 (Super 8) मध्ये भारताला त्याच्याकडून मोठ्या खेळीचे गरज असेल.

(Virat Kohli Flop In T20 World Cup 2024)

IND vs USA| युएसएची मजल 110 पर्यंतच! अर्शदीपने टाकला घातक स्पेल, सुपर 8 भारताच्या टप्प्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version