Breaking News

IPL 2025: स्टंप्सला बॅट मारली तरी नरीन नॉट आऊट का? काय आहे नियम 35.2

ipl 2025
Photo Courtesy: X

IPL 2025 Sunil Narine Hit Stumps: केकेआर आणि आरसीबी (KKRvRCB) यांच्या दरम्यान आयपीएल 2025 (IPL 2025) मधील पहिला सामना खेळला गेला. आरसीबीने 7 गडी राखून विजय मिळवत हंगामाची दमदार सुरुवात केली. मात्र, या सामन्यात केकेआर संघ फलंदाजी करत असताना, एक वादग्रस्त क्षण देखील आला. केकेआरचा सलामीवीर सुनील नरीन (Sunil Narine) याची बॅट स्टंप्सला लागली तरी, त्याला नाबाद ठरवले गेले. 

IPL 2025 Sunil Narine Hit Stumps

आरसीबीचा गोलंदाज रसिक सलाम सातव्या षटकात गोलंदाजी करत असताना, सुनील नरीनने आलेला आखूड टप्प्याचा चेंडू सोडला. तो चेंडू यष्टिरक्षक जितेश शर्माने पकडला. मात्र, चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेल्याने स्क्वेअर लेग पंचांनी चेंडू वाईड दिला. यादरम्यानच नरीन बॅट खाली घेत असताना, त्याची बॅट स्टंप्सला लागली व बेल्स खाली पडली. आरसीबीच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतरही पंचांनी त्याला नाबाद ठरवले. नरीनने चेंडू फटकावण्याची क्रिया पूर्ण केल्यानंतर व चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यानंतर चेंडू डेड झाल्यानंतर नरीनची बॅट स्टंप्सला लागल्यामुळे त्याला नाबाद ठरवले गेले.

काय आहे एमसीसी नियम (MCC Rulebook) 35.2

क्रिकेटचे संचालन करणाऱ्या व नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी यांच्या नियम क्रमांक 35.2 नुसार, फटका खेळताना किंवा धाव घेताना बॅट स्टंप्सला लागली तर फलंदाज बाद ठरवला जातो. मात्र, चेंडू डेड झाल्यानंतर बॅट स्टंप्सला लागली तर फलंदाज नाबाद असतो. याच नियमाचा फायदा नरीन याला मिळाला.

आरसीबीची विजयी सलामी

ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात केकेआर संघाने एक वेळ 10 षटकात 1 बाद 107 अशी दमदार सुरुवात केली होती. मात्र, कृणाल पंड्या याच्या तीन बळींमुळे केकेआरचा डाव 174 पर्यंतच पोहोचू शकला. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने फिल सॉल्ट व विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर केवळ 16.2 षटकातील लक्ष गाठले.

(IPL 2025 Sunil Narine Hit Wicket Rule)

हे देखील वाचा- बॉलिवूडच्या तडक्याने IPL 2025 ची ग्रॅंड ओपनिंग! ईडन गार्डनवर रंगला झगमगाता सोहळा

आयपीएल 2025 मध्ये Ajinkya Rahane ची धमाकेदार सुरूवात! पाहा नेत्रदीपक षटकारांचा व्हिडिओ

Exit mobile version