Breaking News

व्हिडिओ: Maharashtra Kesari 2025 स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ

maharashtra kesari 2025
Photo Courtesy: X

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. गादी विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पंचांना लाथ मारली. आपल्याला चुकीच्या पद्धतीने चितपट दिल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणाने संपूर्ण कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Shivraj Rakshe Kick Refree In Maharashtra Kesari 2025

गादी विभागातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) व डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्यात सुरुवातीलाच वेगवान कुस्ती झाली. मात्र, काही सेकंदातच मोहोळ याने राक्षेला चिटपट केल्याचा निर्णय पंचांनी दिला. यावर राक्षे आणि त्याच्या समर्थकांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

स्वतः राक्षे व प्रशिक्षक काका पवार यांनी रिप्ले दाखवण्याची विनंती केली. मात्र, पंचांनी ते मान्य न केल्याने राक्षे याने पंचांची कॉलर पकडली तसेच त्यांना लाथ मारली. माध्यमांशी बोलताना राक्षे म्हणाला,

“हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. मी दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालो असून, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनू नये म्हणून असा निर्णय दिला गेला. पंचांनी रिप्ले दाखवला असता तर मी स्वतः कुस्ती सोडली असती.”

Shivraj Rakshe Kick Refree In Maharashtra Kesari 2025

Exit mobile version