Breaking News

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा ? Shubman Gill-Gautam Gambhir दरम्यान कडाक्याचे भांडण? वाचा काय घडल

shubman gill-gautam gambhir
Photo Courtesy: X

Fight Between Shubman Gill-Gautam Gambhir In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारत भारताला बॅकफूटवर ढकलले. मात्र, त्याचवेळी तिसऱ्या दिवशी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये (Indian Dressing Room) वाद झाल्याचे वृत्त आहे. 

Fight Between Shubman Gill-Gautam Gambhir In Manchester Test

मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंच दरम्यान हा वाद झाल्याचे काही सूत्रांनी म्हटले आहे. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात एकही बळी मिळवता आला नव्हता. त्यानंतर संघ ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांनी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याला वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला अजून पर्यंत गोलंदाजी का दिली नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर गिलने संताप व्यक्त करत, “या सामन्यात कुलदीप यादव खेळायला हवा होता, असे मी म्हणत होतो.” असे उत्तर दिले. (Latest Cricket News)

त्यानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण काहीसे तणावाचे बनले. अखेर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक व अनुभवी खेळाडू केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांनी वातावरण शांत केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:  ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version