Breaking News

अखेर Rohan Bopanna चा टेनिस कोर्टवरील प्रवास थांबला! 20 वर्षाची कारकिर्द समाप्त

rohan bopanna
Photo Courtesy: X

Rohan Bopanna Announced Retirement: भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली. यासह व्यावसायिक टेनिस जगतातील त्याचा दोन दशकांचा प्रवास समाप्त झाला. त्याने या पोस्टमध्ये आपल्या कारकिर्दीत सहकार्य करणाऱ्या कुटुंबीय व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Rohan Bopanna Announced Retirement From Professional Tennis

आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, ‘निरोप, मात्र हा शेवट नाही. तुमच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टीला निरोप देणे खूप कठीण आहे. 20 अविस्मरणीय वर्षांनंतर, वेळ आली आहे. मी अधिकृतपणे माझे रॅकेट टांगत आहे. मी हे लिहित असताना, माझे हृदय जड आणि कृतज्ञ आहे.’ त्याने या पोस्टमध्ये आपल्या कार्तिकीचा सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढली. तसेच आपले आई-वडील, बहिण, पत्नी व मुले यांचे देखील आभार व्यक्त केले.

रोहन बोपण्णाने त्याच्या शानदार कारकिर्दीत दोन ग्रँडस्लॅम दुहेरीची विजेतेपदे जिंकली. बोपण्णाने 2017 च्या फ्रेंच ओपनमध्ये गॅबी डाब्रोस्कीसह मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तर, 2024 मध्ये मॅथ्यू एब्डेनसह ऑस्ट्रेलियन ओपन आपल्या नावे केली होती. यासह 44 व्या वर्षी ग्रॅंडस्लॅम जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला होता. चार दिवसांपूर्वी त्याने पॅरिस मास्टर्स स्पर्धेत आपला अखेरचा व्यावसायिक सामना खेळला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: कुस्तीक्षेत्रात खळबळ! महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh ला पंजाबमध्ये अटक, वाचा बातमी

Exit mobile version