Breaking News

MLC 2024: पुन्हा एकदा रंगणार एम‌आय विरूद्ध सुपरकिंग्स दरम्यान हाय-वोल्टेज सामना, वाचा कधी-कुठे?

MLC 2024
Photo Courtesy: X

MLC 2024: अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी 2024 (MLC 2024) चा दुसरा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक असतानाच, प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करणारे संघ निश्चित झाले. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय न्यूयॉर्क (MI New York) संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात नाईट रायडर्सचा पराभव करत एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना टेक्सास सुपर किंग्स (Texas Super Kings) विरुद्ध होईल (MINY vs TSK In MLC 2024).

एमएलसी 2024 मध्ये वॉशिंग्टन फ्रीडम व सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न यांनी जबरदस्त खेळ दाखवत यापूर्वीच क्वालिफायर 1 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. तर, फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या नेतृत्वातील टेक्सास सुपर किंग्सनेही आपले तिसरे स्थान निश्चित केले. एमआय न्यूयॉर्क व एलए नाईट रायडर्स यांना आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करण्याची संधी होती. ज्यामध्ये कायरन पोलार्ड (Kieron Pollard) न्यूयॉर्कने विजय मिळवला.

आता न्यूयॉर्क व टेक्सास हे एलिमिनेटर सामन्यात समोरासमोर येणार आहेत. हा सामना 25 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 6 वाजता सुरू होईल. डल्लास येथील ग्रॅंड पिएरे स्टेडियम येथे हा सामना खेळला जाईल. पहिल्या हंगामात एमआय न्यूयॉर्क संघाने विजेतेपद जिंकले होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

टेक्सास संघात कर्णधार प्लेसिस व्यतिरिक्त डेवॉन कॉनवे, मार्कस स्टॉयनिस, नूर अहमद व ड्वेन ब्राव्हो यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. दुसरीकडे न्यूयॉर्क संघाला कर्णधार पोलार्ड, निकोलस पूरन, राशिद खान, डेवाल्ड ब्रेविस व ट्रेंट बोल्ट हे मजबूत बनवतात.

(MINY vs TSK Eliminater In MLC 2024)

Gautam Gambhir ने शब्द फिरवला! जे बोलला त्याच्या उलट वागला, वाचा सविस्तर

Exit mobile version