Breaking News

ENG vs IND Lords Test Day 2: बुमराहच्या बूमनंतर फलंदाजांनी दाखवली जिगर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 2
Photo Courtesy: X

ENG vs IND Lords Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यातील तिसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने इंग्लंडला 387 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करत भारतीय संघाला 3 बाद 145 अशी चांगली मजल मारून दिली.

ENG vs IND Lords Test Day 2 Highlights

– इंग्लंडची दुसऱ्या दिवशी 4‌ बाद 251 वरून सुरूवात

– दिवसातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत जो रूटने पूर्ण केले 37 वे कसोटी शतक ( Joe Root 37 Test Century)

– तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने उडवला बेन स्टोक्सचा त्रिफळा

– पाचव्या षटकात रूट व ख्रिस वोक्स यांना लागोपाठच्या चेंडूवर बुमराहने केले बाद

– जेमी स्मिथ व ब्रायडन कार्स यांनी लंचपर्यंत सावरला इंग्लंडचा डाव

– स्मिथने पूर्ण केले आपले अर्धशतक

– लंचपर्यंत इंग्लंड 7 बाद 353

– लंचनंतर खेळ सुरू होताच दुसऱ्या षटकात सिराजने केले स्मिथला बाद

– जसप्रीत बुमराहने जोफ्रा आर्चरला बाद करत पूर्ण केले पाच बळी (Jasprit Bumrah Fifer)

– लॉर्ड्सवर पाच बळी मिळवणारा 12 वा भारतीय गोलंदाज बनला बुमराह

– ब्रायडन कार्स याने झळकावले कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक

– इंग्लंडचा डाव 387 धावांवर समाप्त (Latest Cricket News)

– भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात, तब्बल चार वर्षानंतर खेळणाऱ्या आर्चरने जयस्वालला केले बाद

– चहापानापर्यंत भारत 1 बाद 44

– करूण नायर व केएल राहुल यांची दुसऱ्या गड्यांसाठी 61 धावांची भागीदारी

– करूण 40 धावा करून बाद

– करूणचा झेल टिपत जो रूट बनला कसोटी इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक

– भारतीय कर्णधार शुबमन गिल 16 धावांवर तंबूत

– केएल राहुल याने आणखी एक अर्धशतक पूर्ण केले, कसोटी कारकिर्दीतील 19 वे अर्धशतक

– दिवस संपेपर्यंत रिषभ पंत व राहुल यांची 38 धावांची नाबाद भागीदारी

– राहुल 53 तर पंत 19 धावांवर नाबाद

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version