Breaking News

ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 1
Photo Courtesy: X

ENG vs IND Lords Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (10 जुलै) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने बॅझबॉल न दाखवता पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळले. जो रूट याने नाबाद 99 धावा करताना ओली पोप व बेन स्टोक्स यांच्यासह शानदार भागीदाऱ्या करत इंग्लंडला 251 पर्यंत पोहोचवले.

ENG vs IND Lords Test Day 1 Highlights

– नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

– भारतीय संघात जसप्रीत बुमराह तर इंग्लंड संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन

– इंग्लंडला सलामीवीर झॅक क्राऊली व बेन डकेट यांनी दिली 43 धावांची सलामी

– नितिशकुमार रेड्डी याने एकाच षटकात दोन्ही सलामीवीरांना केले बाद

– पहिल्या सत्राच्या अखेरीस इंग्लंड 2 बाद 83

– दुसऱ्या सत्रात इंग्लंडची सावध सुरुवात

– जखमी झाल्याने भारताचा उपकर्णधार रिषभ पंत मैदानाबाहेर

– जो रूटने झळकावले कसोटी कारकिर्दीतील 67 वे अर्धशतक

– भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज बनला रूट

– दुसऱ्या सत्रात एकही गडी न गमावता इंग्लंडने केल्या 70 धावा

– चहापानापर्यंत इंग्लंड 2 बाद 153

– अखेरच्या सत्राच्या सुरुवातीला जडेजाने ओली पोपला 44 धावांवर केले बाद

– हॅरी ब्रूकचा अवघ्या 11 धावांवर बुमराहने उडवला त्रिफळा

– जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्सने सावरला इंग्लंडचा डाव

– रूट- स्टोक्स जोडीने 79 धावांची नाबाद भागीदारी करत खेळून काढले संपूर्ण सत्र

– रूट 99 तर स्टोक्स 39 धावांवर नाबाद

– दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने बनवल्या 4 बाद 251 धावा

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Joe Root एकटा बास! भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज

Exit mobile version