Breaking News

IPL Ticket Scam: आयपीएलमध्ये आणखी एक घोटाळा, राज्य संघटनेचा अध्यक्षच निघाला मास्टरमाईंड, 5 अटकेत

ipl ticket scam
Photo Courtesy: X

IPL Ticket Scam: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम नुकताच पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आता हंगाम समाप्त होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतर, आणखी एक वाद आयपीएल 2025 (IPL 2025) सोबत जोडला गेला आहे.

IPL Ticket Scam CID Arrest Jagan Mohan Rao

आयपीएल 2025 दरम्यान हैदराबाद क्रिकेट संघटना (Hyderabad Cricket Association) व सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्या दरम्यान तिकिटांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आपले घरचे मैदान बदलण्याची तयारी करत असल्याचे देखील म्हटले गेलेले. याच तिकिट वाटपामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर आले आहे.

आयपीएल नियमानुसार, फ्रॅंचायजी ज्या मैदानावर घरचा सामना खेळणार आहे, त्या मैदानावरील क्षमतेच्या दहा टक्के तिकिट राज्य संघटनेला मोफत देत असतो. त्यानुसार हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम येथे हैदराबाद क्रिकेट संघटनेला 3900 तिकीट दिली जात होती. मात्र, संघटनेचे अध्यक्ष जगन मोहन राव व इतर पदाधिकाऱ्यांनी सनरायझर्स हैदराबाद फ्रॅंचायजीवर अतिरिक्त तिकिटांसाठी दबाव टाकला. तसेच, काही कॉर्पोरेट बॉक्स बंद करून ठेवले.

या संपूर्ण प्रकरणावर तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे महासचिव धर्मगुरवर रेड्डी यांनी 9 जून रोजी सीआयडीकडे तक्रार दाखल केली. यामध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग व दबाव टाकणे असे गंभीर आरोप केले. तसेच, राव यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीकरिता काही खोटे दस्तावेज दाखल केल्याचे देखील त्यांनी पुराव्यासह सादर केले. या संपूर्ण प्रकरणात सीआयडीने तात्काळ कारवाई करत पाच जणांना अटक केली.

अटक झालेल्यांमध्ये जगन मोहन राव यांच्यासह संघटनेचे कोषाध्यक्ष सी.श्रीनिवास राव, सीईओ सुनील कांते, महासचिव राजेंद्र यादव व जगन मोहन राव यांच्या पत्नी जी. कविता यांचा समावेश आहे.\

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हे देखील वाचा- Mohammed Azharuddin: स्टेडियमच्या स्टॅंडला दिलेले महान कर्णधाराचे नाव हटवले, IPL 2025 चालू असतानाच संघटनेचा धाडसी निर्णय

 

Exit mobile version