Breaking News

Mohammed Azharuddin: स्टेडियमच्या स्टॅंडला दिलेले महान कर्णधाराचे नाव हटवले, IPL 2025 चालू असतानाच संघटनेचा धाडसी निर्णय

Mohammed Azharuddin
Photo Courtesy: X

HCA Removed Mohammed Azharuddin Name From Stand: आयपीएल 2025 (IPL 2025) सुरू असतानाच हैदराबाद क्रिकेट संघटनेने (Hyderabad Cricket Association) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammed Azharuddin) यांच्या नावे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या स्टॅंडचे नाव बदलले आहे.

HCA Removed Mohammed Azharuddin Name From Stand

उप्पल स्टेडियम (Uppal Stadium) येथे अझरूद्दीन यांचे नाव नॉर्थ पव्हेलियनला देण्यात आले होते. मात्र, नुकतेच संघटनने नुकतेच हे नाव हटवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या पुढील आयपीएल सामन्यांच्या तिकिटावर केवळ नॉर्थ पव्हेलियन असाच उल्लेख केला गेला जाईल. संघटनेचे एथिक्स ऑफिसर जस्टिस व्ही. इस्वरा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

मोहम्मद अझरूद्दीन हे 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनले होते. त्यावर्षीच्या वार्षिक बैठकीत त्यांनी नॉर्थ पव्हेलियनचे असलेले ‘व्हीव्हीएस लक्ष्मण स्टँड’ हे नाव बदलून स्वतःचे नाव दिले होते. मात्र, यावर्षी संघटनेच्या लॉर्ड्स क्रिकेट क्लबने ते नाव हटवण्याची मागणी केलेली. पदाचा फायदा स्वतःसाठी केल्याचा आरोप त्यांनी ठेवला होता. त्यामुळे संघटनेच्या नियम क्रमांक 38 नुसार अझरूद्दीन हे दोषी ठरले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(HCA Removed Mohammed Azharuddin Name From Stand)

हे देखील वाचा- कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

Exit mobile version