Breaking News

BREAKING| इगा स्वियाटेक बनली French Open 2024 ची राणी! चौथ्यांदा उंचावली ट्रॉफी, पावलोनी फायनलमध्ये पराभूत

FRENCH OPEN 2024
Photo Courtesy: X/Roland Garros

French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 चा महिला एकेरीचा अंतिम सामना (French Open 2024 Womens Singles) अंतिम सामना शनिवारी (8 जून) खेळला गेला. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) वर पार पडलेल्या या सामन्यात, पोलंडची अग्रमानांकित इगा स्वियाटेक (Iga Swiatek) हिने बाराव्या मानांकित इटलीच्या जास्मिन पावलोनी हिला 6-2, 6-1 तसेच सरळ सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले. तिचे हे चौथे फ्रेंच ओपन विजेतेपद ठरले (French Open 2024 Winner Iga Swiatek).

जागतिक क्रमवारी पहिल्या क्रमांकावर असलेली इगा स्वियाटेक स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विजेतेपदाची दावेदार होती. तिने यापूर्वी तीनदा ती स्पर्धा जिंकलेली. तर, सलग तिसऱ्यांदा ती अंतिम फेरी दाखल झालेली. दुसऱ्या बाजूला जास्मिन पावलोनी पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. इगाने तिला सुरुवातीपासूनच स्पर्धेत न ठेवता आक्रमक सुरुवात केली. पहिला सेट 6-2 तिने आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये देखील ती 5-0 अशी पुढे होती. त्यानंतर जास्मिन हिने एक गेम जिंकत, आपली इभ्रत राखली. त्यानंतर शेवटचा गेम जिंकत इगाने चौथ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केले.

ओपन एरामध्ये यापूर्वी फक्त दोनच महिला टेनिसपटूंनी फ्रेंच ओपन विजेतेपदाची हॅट्रिक नोंदवली होती. मोनिका सेलेसने 1990,1991 व 1992 असे सलग तीनदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केलेले. तर, जस्टिन हेनिनने 2005,2006 व 2007 मध्ये अशी कामगिरी करून दाखवली होती.

(Iga Swiatek Won French Open 2024 Womens Singles Title)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version