Breaking News

Nayana James ची गोल्डन जंप! तैवान ओपनमध्ये भारताच्या खात्यात तिसरे मेडल

nayana james
Photo Courtesy: X/ASI

Nayana James Won Gold Medal|भारताची उदयोन्मुख लांबउडीपटू नयना जेम्स (Nayana James) हिने तैवान ऍथलेटिक्स ओपन (Taiwan Athletics Open) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 6.43 मीटर इतकी उडी मारत सर्वोत्तम कामगिरी केली.

नयना हिने 6.43 मीटर इतकी लांब उडी मारत स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.‌ रौप्य पदक एशियन चॅम्पियन असलेल्या जपानच्या सुमेर हाता हिने आपल्या नावे केले. तिला 6.37 मीटर उडी मारता आली. तर कोरियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.

या स्पर्धेत खेळताना पहिल्या दिवशी भारतासाठी भालाफेकीत डीपी मनू (DP Manu) याने सुवर्णपदक जिंकले होते. तर, 100 मिटर अडथळ्यांच्या शर्यतीत नित्या रामराज (Nithya Ramraj) ला रौप्य पदक जिंकण्यात यश आलेले.

(Indian Long Jumper Nayana James Won Gold In Taiwan Open)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version