Breaking News

आम्ही चालवू पुढे वारसा! CSK विरूद्ध ऋतुराज बनला विकेटकिपर, MPL 2024 मध्ये दिसला धोनीच्या अवतारात

mpl 2024
Photo Courtesy: X

Ruturaj Gaikwad Wicketkeeping In MPL 2024| एमपीएल 2024 स्पर्धेचा अखेरचा टप्पा आता जवळ आला आहे. सोमवारी (17 जून) पुणेरी बाप्पा व छत्रपती संभाजी किंग्स (CSK vs PB) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या सामन्यात वेगळ्या भूमिकेत दिसला. संघाचे नेतृत्व करताना त्याने प्रथमच यष्टीरक्षण (Ruturaj Gaikwad Wicketkeeping ) केले.

हंगामातील अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या पुणेरी बाप्पा संघाने या सामन्यात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. पुणेरी बाप्पा यंदा प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकले नाहीत. यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड याने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. ऋतुराज यापूर्वी कोणत्याही स्तरावर यष्टीरक्षण म्हणून खेळताना दिसला नव्हता. भारतीय संघाच्या सराव सत्रात मात्र त्याला अनेकदा ग्लोव्हज घातलेले पाहिले गेलेले आहे.

ऋतुराजने या सामन्यात एक झेल घेत आपले योगदान दिले. ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो. संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा देखील यष्टीरक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीत खेळत. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

(Ruturaj Gaikwad Doing Wicketkeeping In MPL 2024 Against CSK)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version