USA vs IRE : – फ्लोरिडा येथील अमेरिका आणि आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील टी20 विश्वचषकातील 30 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि यासह पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशांवरही पाणी फेरले. उभय संघातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. परिणामी अमेरिकेच्या खात्यात 5 गुण जमा झाले. पाकिस्तान संघाने त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना जिंकल्यानंतरही त्यांचे चारच गुण होतील, ज्यामुळे ते स्पर्धेतून आताच बाहेर पडले आहेत. यानंतर, सामना रद्द करण्याचा निर्णय होण्यापूर्वी पाऊस मध्यंतरी थांबला होता, तरीही सामना का सुरू झाला नाही, असा प्रश्न पाकिस्तानचे चाहते उपस्थित करत आहेत. विश्वचषकातून पाकिस्तानला वगळण्यासाठी हे कटकारस्थान रचले होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत नियम काय सांगतात? ते पाहूया..
ओल्या खेळपट्टीवर खेळाडूंना दुखापतीची शक्यता
खरं तर, पावसाने व्यत्यय आणलेला कोणताही सामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक संभाव्य परिस्थिती पाहिली जाते. या सामन्याबाबतही असेच काहीसे करण्यात आले. सामनाधिकारी आणि पंचांनी किमान चार ते पाच वेळा मैदानाची पाहणी केली. ड्रायरने मैदान कोरडे करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण आउटफिल्ड ओलेच राहिले. ओल्या आउटफिल्डमुळे खेळाडूंना दुखापत होण्याची भीती असते.
5-5 षटकांचीही शक्यता तपासली गेली
आउटफिल्ड ओले असल्यास, सामना आयोजित करण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी केली जाते. हा सामना 5-5 षटकांचा करण्याची स्थितीही तपासली गेली. यासाठी कटऑफची वेळ भारतीय वेळेनुसार रात्री 11:46 वाजता होती, मात्र रात्री 11 च्या सुमारास फ्लोरि़डात पुन्हा पाऊस सुरू झाला. यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात 1-1 गुण विभागले गेले.
साखळी फेरी आणि सुपर-8 साठी कोणताही राखीव दिवस नाही
टी20 विश्वचषकात साखळी फेरी आणि सुपर-8 सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. त्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी होऊ शकला नाही. मात्र, पावसामुळे भारत-कॅनडा सामन्यावरील संकटही वाढले आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु पावसामुळे सामना रद्द झाला तरीही भारताचे अ गटात सर्वाधिक 7 गुण होतील.
kridacafe
Hey! Do you know if they make any plugins to safeguard against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any suggestions?
With havin so much content do you ever run into any issues of plagorism or copyright violation? My site has a lot of exclusive content I’ve either written myself or outsourced but it seems a lot of it is popping it up all over the internet without my permission. Do you know any methods to help reduce content from being ripped off? I’d definitely appreciate it.
After all, what a great site and informative posts, I will upload inbound link – bookmark this web site? Regards, Reader.
I conceive this internet site has got very great composed content blog posts.