Breaking News

आजपासून FIFA Club World Cup 2025 चा थरार सुरू! जगभरातील 32 अव्वल फुटबॉल क्लबची महिनाभर झुंज

FIFA Club World Cup 2025
Photo Courtesy: X

FIFA Club World Cup 2025: प्रतिष्ठेच्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 स्पर्धेला रविवारी (15 जून) सुरुवात होत आहे. जगभरातील अव्वल 32 फुटबॉल क्लब या स्पर्धेत सहभागी होतील. यावेळेस स्पर्धेचे यजमानपद अमेरिका भूषवतेय. स्पर्धेतील पहिला असेल इंटर मियामी विरूद्ध अल अहली यांच्या दरम्यान खेळला जाईल. त्यामुळे पहिल्या सामन्यात फुटबॉल प्रेमींना लिओनेल मेस्सीला मैदानावर पाहता येईल. 

FIFA Club World Cup 2025

या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 32 संघांना आठ गटामध्ये विभागले आहे. प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश असेल. स्पर्धेची साखळी फेरी 27 जूनपर्यंत खेळली जाईल. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 14 जुलै रोजी मेट लाईफ स्टेडियम न्यूजर्सी येथे होईल.

ए गट- अल अहली, इंटर मियामी, पोर्टो, पल्मेरास

बी गट- एटलिटीको माद्रिद, पीएसजी, बोटाफोगो, सिएटल सोंडर्स

सी गट- ऑकलंड सिटी, बायर्न म्युनिक, बेनफिका, बोका ज्युनिअर्स

डी गट- चेल्सी, फ्लेमिंगो, लिऑन, इएस टुनिस

ई गट- इंटर मिलान, मोंटेसरी, रिव्हर प्लाट, उरावा रेड्स

एफ गट- बोरूशिया डॉर्टमंड, फ्लुमिनेंस, उलसन, मामेलोडी सनडोज

जी गट- अल एन, जुवेंटस, मॅंचेस्टर सिटी, वायडॅड

एच गट- अल हिलाल, पचुका, रियाल माद्रिद, आरबी साल्झबर्ग

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान,