दुखापतीने खाल्लं करियर! Chris Woakes ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

chris woakes
Photo Courtesy: X

Chris Woakes Announced Retirement From International Cricket: इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू ख्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सततच्या दुखापती व ऍशेस मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने ‌हा निर्णय घेतला. यासह त्याच्या‌ 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती झाली. पुढील काळात काऊंटी ‌क्रिकेट व जगभरातील ‌फ्रॅंचायजी क्रिकेट आपण खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले.

Chris Woakes Announced Retirement From International Cricket

वोक्स याने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात तो बराच वेळा संघाच्या आत-बाहेर होत राहिला. ओएन मॉर्गन याने इंग्लंडचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर वोक्सला सातत्याने संधी मिळाली. त्यानंतर तो इंग्लंडच्या तिन्ही संघांचा महत्त्वाचा सदस्य बनलेला. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी 62 सामने खेळताना 2034 भावा व 192 बळी मिळवले. तर, 122 वनडे सामन्यात 1524 व 173 बळी आपल्या नावे केले. याव्यतिरिक्त 33 टी20 सामने खेळताना त्याला 31 बळी मिळवता आले.

इंग्लंडने मिळवलेल्या ऍशेस विजयात त्याने निर्णय भूमिका पार पाडली होती‌. मायदेशात इंग्लंडने जिंकलेल्या 2019 वनडे विश्वचषक संघाचा तो भाग होता. तसेच 2022 टी20 विश्वचषक जिंकलेल्या संघाचा देखील तो सदस्य राहीला. भारताविरुद्ध मागील महिन्यात समाप्त झालेल्या कसोटी मालिकेत अखेरच्या दिवशी हात फ्रॅक्चर असतानाही त्याने मैदानावर येण्याचे धारिष्ट दाखवले होते. या कृतीसाठी त्याचे विशेष कौतुक झाले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Mithun Manhas च बनला BCCI अध्यक्ष! बिनविरोध झाली निवड