Breaking News

तडकाफडकी बदलले जाणार BCCI President! त्या नियमाने झाले वांदे, वाचा सविस्तर

bcci president
Photo Courtesy: X

Roger Binny may step down as BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) मध्ये एक मोठा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या रॉजर बिन्नी यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. याबाबतची चर्चा बीसीसीआयमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Roger Binny may step down as BCCI President

सौरव गांगुली यांच्यानंतर बिन्नी यांनी 2022 मध्ये बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला होता. बिन्नी यांनी नुकतीच 19 जुलै रोजी वयाची 70 वर्षे पार केली. बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणताही पदाधिकारी 70 पेक्षा जास्त वय असताना प्रशासनात पद भूषवू शकत नाही. याच कारणाने बिन्नी यांना आपले पद सोडावे लागले. असे झाल्यास वर्तमान बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) हे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळू शकतात.

नवे क्रीडा धोरण ऑगस्ट 2025 मध्ये लागू झाल्यास बिन्नी यांचा कार्यकाळ वाढवू शकतो. नव्या क्रीडा धोरणात देशातील सर्व क्रीडा संघटनांतील पदाधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 75 वर्ष करण्यात आले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द

Exit mobile version