Breaking News

Rohit-Virat ला पुन्हा विश्रांती? श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोघांत ‘कॅप्टन्सी रेस’

VICTORY PARADE
Photo Courtesy: X

Rohit-Virat Will Rest Again: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे व टी20 मालिका खेळेल. यातील वनडे मालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ विजेता ठरला. त्यानंतर, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संपूर्ण युवा संघ पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आता श्रीलंका दौऱ्यासाठी देखील तसाच निर्णय घेतला जाऊ शकतो. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची महत्त्वपूर्ण वनडे मालिका खेळेल. आगामी चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) आधी भारतीय संघ केवळ सहा सामने खेळणार आहे. त्यातील हे तीन सामने महत्त्वाचे असतील. मात्र, बीसीसीआय असे असताना देखील काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

मिळत असलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते. असे झाल्यास मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल (KL Rahul) व टी20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यापैकी एकाला कर्णधार बनवण्यात येईल. सध्या तरी यामध्ये हार्दिकचेच पारडे जड दिसून येते. त्यानंतर होणाऱ्या टी20 मालिकेत देखील हार्दिकच कर्णधार असेल.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आधी श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळेल. भारतीय संघाने मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत विश्वविजेते होण्यापासून रोखलेले. त्यामुळे भारतीय संघ ही स्पर्धा आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल.

(Rohit-Virat Might Rest For Srilanka Tour)

Exit mobile version