Breaking News

मोठी बातमी: Shikhar Dhawan ने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला, “माझे क्रिकेट शेवटाकडे येऊन…”

SHIKHAR DHAWAN
Photo Courtesy: X

Shikhar Dhawan Hits Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे आयपीएल 2024 चा पूर्ण हंगाम खेळू शकला नाही. स्पर्धेच्या मध्यात त्याला दुखापत झाल्यामुळे तो बाकावर बसून राहिला. त्यानंतर पंजाब किंग्स संघाची कामगिरी खराब राहिली व ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर घसरले. अशातच आता शिखर याने स्वतःच्या निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत.

पंजाब संघाचा आयपीएलमधील प्रवास संपल्यानंतर शिखर एका मुलाखतीत बोलत होता. त्यावेळी त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचारले असता तो म्हणाला,

“सध्या मी आणि माझी कारकीर्द एका बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे. जेव्हा माझे क्रिकेट शेवटाकडे जाईल तेव्हा एक नवी सुरुवात होईल. तुमच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी एक ठराविक वय असते. माझ्याकडे कदाचित एक किंवा दोन वर्ष अशी आहेत.”

आपल्या दुखापतीविषयी बोलताना तो म्हणाला,

“मी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. पूर्ण ठीक होण्यासाठी काही वेळ लागेल. आयपीएल अर्ध्यातून सोडणे खरेच निराशाजनक होते.”

शिखर खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेत केवळ पाच सामने खेळलेला. यामध्ये त्याने 30 पेक्षा जास्तच्या सरासरीने 152 धावा केल्या.

शिखर धवन आता वयाच्या 40 कडे चालला असून भारतीय संघात त्याचे पुनरागमन कठीण दिसत आहे. त्याने भारतीय संघासाठी आपला अखेरचा सामना 2022 मध्ये खेळला होता. सध्या भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड व साई सुदर्शन यांच्यासारखे युवा फलंदाज येत असल्याने, त्याचे पुनरागमन होणे जवळपास अशक्य आहे.

(Shikhar Dhawan Hits Retirement In Two Years)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version