Breaking News

Shikhar Dhawan Retirement: शिखरच्या करियरमधील 5 संस्मरणीय इनिंग्स! चाहत्यांच्याही राहतील नेहमीच आठवणीत

Shikhar dhawan retirement
Photo Courtesy: X

Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली (Shikhar Dhawan Retirement). शिखरने आपल्या 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक शानदार खेळ्या केल्या. त्यातील अजरामर झालेल्या पाच खेळ्यांविषयी आपण जाणून घेऊ.

SHIKHAR DHAWAN TOP 5 INNINGS

1. पदार्पणातील 187: वनडे पदार्पणात फारशी चमकदार कामगिरी कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. मात्र, कसोटी पदार्पणात त्याने एक ऐतिहासिक खेळी केलेली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2013 च्या मोहाली कसोटीत पदार्पण करताना त्याने तुफानी 187 धावा चोपल्या होत्या (Shikhar Dhawan 187). त्याने अवघ्या 85 चेंडूंमध्ये सर्वात वेगवान कसोटी शतक पूर्ण केले होते. पहिल्याच दिवशी 185 धावा केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी फक्त दोन धावा त्याला करता आलेल्या. मात्र, या खेळीने त्याला गब्बर ही ओळख मिळवून दिली.

2. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013: कसोटी पाठोपाठ वनडे संघातील जागा नक्की झाल्यानंतर त्याने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली (Shikhar Dhawan Champions Trophy). भारतीय संघाने विजेतेपद पटकावलेल्या स्पर्धेत त्याच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पूर आलेला. त्याने पाच सामन्यात तब्बल 363 धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 90.75 अशी होती. यामध्ये 2 शतके व एक अर्धशतक होते. या स्पर्धेपासून त्याला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावजले गेले.

3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 95 धावा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 2013 मध्ये झालेल्या अजरामर वनडे मालिकेतील जयपूर वनडेत शिखरने 95 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. भारतीय संघ या सामन्यात तब्बल 360 धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी शिखरने रोहित शर्मासोबत 26.1 षटकात 176 धावांची सलामी दिली होती. त्याने 86 चेंडूवर 14 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या होत्या. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी नाबाद शतके ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता.

4. श्रीलंकेत दमदार कमबॅक: जवळपास नऊ महिने संघापासून दूर राहिल्यानंतर 2017 श्रीलंका दौऱ्यावर शिखरने पुनरागमन केले होते. गाले येथे झालेल्या कसोटीत त्याने हे पुनरागमन साजरे केले. त्याने पहिल्याच डावात फक्त एक 168 चेंडूवर 190 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पुजारासोबत 253 धावांची भागीदारी करत 600 अशी तगडी मजल मारून दिली होती.

5. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे विश्वचषक शतक: शिखर आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचा नेहमीच महत्त्वपूर्ण खेळाडू राहिला होता. 2019 वनडे विश्वचषकातून तो दुखापतीमुळे लवकरच बाहेर पडलेला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंगठ्याला दुखापत झालेली असताना देखील त्याने शतक ठोकले होते. तो 25 धावांवर खेळत असताना चेंडू त्याच्या अंगठ्यावर लागलेला. मात्र, जबरदस्त इच्छाशक्ती दाखवत 117 धावांची खेळी केली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(Shikhar Dhawan Retirement Top 5 Innings Of Shikhar Dhawan International Cricket)

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटचा ‘गब्बर’ रिटायर! 20 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला दिला विराम