
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट कोहली (Virat Kohli) याला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यावेळी विराटने पत्रकार परिषदेत गांगुलीवर चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेकांनी गांगुलीवर टिका देखील केलेली. या संपूर्ण प्रकरणानंतर रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले. हा निर्णय गांगुली याने घेतला होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
याच निर्णयाबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली (Sourav Ganguly Statement) म्हणाला,
“ज्यावेळी मी रोहितकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली होती. आता रोहितच्या नेतृत्वात भारताने टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर मला अपशब्द वापरणारे लोक अचानक गप्प झाले. इतकेच काय लोक हे देखील विसरले की, रोहितला मीच कर्णधार बनवले होते.”
वेस्ट इंडिज व अमेरिका येथे झालेल्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला होता. भारताने 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर तब्बल 17 वर्षानंतर टी20 विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले. या विश्वचषकानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली.
(Sourav Ganguly Statement On Rohit Sharma Captaincy)