
UEFA Conference League 2025: युरोपियन फुटबॉल मधील प्रतिष्ठेची युएफा कॉन्फरन्स लीग 2025 (UEFA Conference League 2025) ही स्पर्धा पार पडली. इंग्लंडच्या चेल्सी एफसी (Chelsea FC) संघाने स्पेनच्या रियाल बेटीस संघाला हरवत पहिल्यांदा ही ट्रॉफी जिंकली. त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे.
UEFA Conference League 2025 Price Breakdown
EUROPEAN WINNERS!!! 🏆 pic.twitter.com/sCm3slcbJv
— Chelsea FC (@ChelseaFC) May 28, 2025
चेल्सीने रियाल बेटीसला 4-1 असे पराभूत करत या ट्रॉफीवर हक्क सांगितला. त्यांनी साखळी फेरी पार केल्यानंतर 1 लाख 67 हजार पाऊंड त्यांना मिळाले. यानंतर प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर 6 लाख 70 हजार पाऊंडची वाढ त्यांच्या बक्षीस रकमेत झाली. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यावर एक मिलियन पाऊंड तर उपांत्य फेरी पोहोचल्यावर दोन मिलियन पाऊंड त्यांच्या रकमेत वाढले. अंतिम फेरीत खेळणाऱ्या प्रत्येक संघाला 3 मिलियन पाउंड इतकी रक्कम मिळाली. हा संपूर्ण विचार केल्यास चेल्सीने जवळपास 10 मिलीयन पाऊंड कमावले. भारतीय रुपयात याचा विचार केल्यास ही रक्कम 108 कोटी रुपये इतकी होते.
UEFA Conference League 2025
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Avinash Sable ने 36 वर्षांचा वनवास संपवला! भारताच्या खात्यात एशियन ऍथलेटिक्सचे सुवर्ण
इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।