
Euro 2024: युरो 2024 चे चारही उपांत्यपूर्व फेरीचे (Euro 2024 QF) सामने शनिवारी (6 जुलै) समाप्त झाले. अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने टर्कीचा 2-1 असा पराभव केला. यासह आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (Euro 2024 Semi Final) सामने देखील निश्चित झाले आहेत.
🥁 Introducing your final four…
🇪🇸 Spain
🇫🇷 France
🇳🇱 Netherlands
🏴 EnglandWho wins it? 🤔#EURO2024 pic.twitter.com/vkQOd2Yb0x
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 6, 2024
उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीला स्पेनकडून 2-1 असा शेवटच्या क्षणी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने पोर्तुगालला पेनल्टी शूटआउटमध्ये मात दिली. तिसऱ्या सामन्याचा निकाल देखील पेनल्टी शूटआउटमध्येच लागला. इंग्लंडने स्वित्झर्लंडला पेनल्टी शूटआउटमध्ये हरवत उपांत्य फेरी गाठली. तर अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सने आपल्या अनुभवाच्या जोरावर 2-1 असा विजय साकार केला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेन आणि फ्रान्स (SPA vs FRA) लढताना दिसतील. हा सामना 10 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स (ENG vs NED) भिडणार आहेत. हा सामना 11 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 वाजता खेळला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना 15 जुलै रोजी होणार आहे.
(Euro 2024 Semi Final Fixtures)