
Ayush Mhatre Century In SMAT 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ (MUMvVID) अशा झालेल्या सामन्यात मुंबईने 7 गडी राखून विजय मिळवला. मुंबईचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याने तुफानी शतक झळकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे आजच त्याची भारताच्या अंडर 19 संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
Ayush Mhatre Century In SMAT 2025
इकाना स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबईला 193 धावांचे आव्हान मिळाले होते. अजिंक्य रहाणे व हार्दिक तामोरे केवळ 21 धावांमध्ये तंबूत परतले. मात्र, केवळ 18 वर्षाच्या आयुष म्हात्रे याने तुफानी फटकेबाजी केली. सुरवातीला सूर्यकुमार यादव याच्यासह 88 व त्यानंतर शिवम दुबेसह 85 धावांची नाबाद भागीदारी केली. आयुषने 53 चेंडूवर 8 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा केल्या. मुंबईने केवळ 17.5 षटकात 193 चे आव्हान पार केले.
तत्पूर्वी, अमन मोखाडेच्या 61 व अथर्व तायडेच्या 66 धावांच्या जोरावर विदर्भाने 192 अशी मोठी धावसंख्या उभी केली होती. मुंबईसाठी साईराज पाटील व शिवम दुबे त्यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: U19 Asia Cup 2025 साठी भारतीय संघ घोषित! मुंबईकर बनला कर्णधार
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।