Breaking News

Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

champions trophy 2025
Photo Courtesy: X/Blackcaps

Newzealand Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली गेली असून, बरेच अनुभवी खेळाडू संघाबाहेर आहेत.

Newzealand Squad For Champions Trophy 2025

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार सॅंटनर याने निवडलेल्या 15 खेळाडूंची नावे जाहीर केली. माजी कर्णधार केन विल्यमसन याच्या खांद्यावर प्रामुख्याने फलंदाजीची धुरा असेल. त्याला सलामीवीर म्हणून रचिन रविंद्र व डेवॉन कॉनवे साथ देतील. मधल्या फळीत टॉम लॅथम, डेरिल मिचेल, विल यंग, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिप्स दिसतील. वेगवान गोलंदाजीमध्ये संघाकडे भरपूर पर्याय असणार आहेत. मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसन गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतील. तर, विल ओ’रोरके, नॅथन स्मिथ व बेन सिएर्स हे पहिल्यांदाच ट्रॉफी खेळताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी दशकभरानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाचा भाग नसतील. तर, केंद्रीय करारात स्थान नसल्याने जिमी निशाम, ऍडम मिल्ने व फिन ऍलन यांच्या नावाचा विचार झाला नाही. अनुभवी फिरकीपटू ईश सोढी हा संघात आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ: मिचेल सॅंटनर (कर्णधार), केन विल्यमसन, रचिन रविंद्र, डेवॉन कॉनवे, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, विल यंग, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ओ’रोरके, नॅथन स्मिथ व बेन सिएर्स.

(Newzealand Squad For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, अनुभवी खेळाडूचे 15 महिन्यांनी पुनरागमन

 

Exit mobile version