Breaking News

क्लास इज पर्मनंट! Cheteshwar Pujara च्या बॅटमधून आली 18 वी डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी दाखवतोय फॉर्म

cheteshwar pujara
Photo Courtesy: X

Cheteshwar Pujara Double Century In Ranji Trophy: सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामात (Ranji Trophy 2024-2025) दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. एलिट ड गटातील सौराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज व सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या सामन्यात चमकला. त्याने नाबाद द्विशतकी खेळी केली. हे त्याचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 18 वे द्विशतक ठरले. यासह भारतीय क्रिकेट इतिहासात त्याने सर्वाधिक प्रथमश्रेणी द्विशतकांचा विक्रम आपल्या नावे केला.

सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यातील या सामन्यात छत्तीसगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 578 धावा उभ्या केल्या. त्याच्या बदल्यात सौराष्ट्राने चांगली मजल मारत चौथ्या दिवशी चारशे धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान पुजाराने 18 वे द्विशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 234 धावांची दमदार खेळी केली.

भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका होईल. भारताने 2017-2018 व 2020-2021 अशी सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली होती. या दोन्ही विजयात पुजारा याचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार केल्यास पुजारा हा पुनरागमनासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

पुजारा खेळत असलेल्या तिसऱ्या क्रमांकावर सध्या शुबमन गिल फलंदाजी करताना दिसतो. मात्र, मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुजारा याला संघाचा भाग बनवून, ती अनुभवाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापन करू शकते.

(Cheteshwar Pujara Double Century In Ranji Trophy)

हे देखील वाचा:IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय

Exit mobile version