
Cheteshwar Pujara Slams Team India After Kolkata Test Loss: भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची भर पडली असून, त्याने तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Cheteshwar Pujara Slams Team India
कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांमध्ये संपवला. त्यानंतर भारतीय संघापुढे 124 धावांचे आव्हान होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी पुढे भारताचा डाव केवळ 93 धावांमध्ये संपला. पर्यायाने भारतीय संघाला 30 धावांनी लाजिरवाण्या पद्धतीने पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.
या पराभवानंतर बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला, “तुम्ही असा पराभव मान्यच करू शकत नाही. संघ संक्रमणाच्या काळातून जात आहे, हे कारण नसावे. संघात असलेल्या सर्वच खेळाडूंना मोठा अनुभव आहे. एका चांगल्या खेळपट्टीवर खेळताना तुमच्या जिंकण्याची संधी अधिक असते. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारची खेळपट्टी बनवता त्यावेळी तुम्ही दुसऱ्या संघाला देखील सामन्यात आणता. इंडिया ए संघ असता तरी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या या संघाला पराभूत केले असते.”
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्यानंतर बोलताना म्हटले होते की, अशाच खेळपट्टीची मागणी आम्ही केली होती. मात्र, आमच्या फलंदाजांकडून चांगला खेळ झाला नाही. त्यानंतर समालोचक आकाश चोप्रा यांनी “भारतीय संघ संक्रमणातून जात आहे” असे वक्तव्य केल्यानंतर पुजाराने आपले म्हणणे मांडले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।